महत्वाचे

सुचना

Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.            .......

इयत्ता २ री ते १२ वी च्या मुलांची online पद्धतीने नोंद करणे


मागील वर्षी student पोर्टल ला माहिती भरावयाचे बाकी असलेल्या इयत्ता २ री ते १२ वी च्या  विद्यार्थ्यांची माहिती Online पद्धतीने कशी भरावी याबाबतचे माहितीपत्रक


     सन २०१५-१६ या वर्षी शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती student पोर्टल ला नोंद करणे अपेक्षित होते.परंतु काही शाळांचे सर्व विद्यार्थी student पोर्टल ला नोंद झालेले नसल्याने चालू वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षी अशा नोंद न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मध्ये मागील वर्षी नोंद न झालेले विधार्थी,तसेच या वर्षी वयानुरूप दाखल झालेले विद्यार्थी,पुनर्प्रवेश घेतलेले जे मागील वर्षी नोंदवले गेले नव्हते असे विद्यार्थी,परराज्यातील जे या वर्षी आपल्या शाळेत नव्याने दाखल झालेले आहे असे विद्यार्थी student पोर्टल ला नोंदवणे गरजेचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती student पोर्टल ला नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.अशा विद्यार्थ्यांची माहिती नोंदवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या login द्वारे त्या त्या शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा शाळांना कशा प्रकारे उपलब्ध करून द्यावी याबाबत आता सविस्तर माहिती पाहूया....

     सर्वप्रथम ज्या शाळांचे विद्यार्थी मागील वर्षी नोंदवले गेले नाही, तसेच या वर्षी वयानुरूप दाखल झालेले विद्यार्थी,पुनर्प्रवेश घेतलेले जे मागील वर्षी नोंदवले गेले नव्हते असे विद्यार्थी,परराज्यातील जे या वर्षी आपल्या शाळेत नव्याने दाखल झालेले आहे  अशा शाळांनी गटशिक्षणाधिकारी यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लेखी विनंती करणे गरजेचे आहे,हे लक्षात घ्यावे.अशी लेखी विनंती उपलब्ध झाल्यावर गटशिक्षणाधिकारी त्या त्या शाळांना ही सुविधा आपल्या login मधून उपलब्ध करून देतील.यासाठी गटशिक्षणाधिकारी हे आपले student पोर्टल ला login करतील.



    वरील स्क्रीन प्रमाणे गटशिक्षणाधिकारी हे आपल्या student पोर्टलला login करतील.त्यानंतर त्यांना खालील प्रकारे स्क्रीन दिसून येईल.


         या स्क्रीन मधील maintenanceया tab मध्ये  Assign Online Entry School या subtab ला क्लिक करतील. 

         वरील स्क्रीन मधील maintenanceया tab मध्ये  Assign Online Entry School या subtab ला क्लिक केल्यावर खालील प्रकारची स्क्रीन गटशिक्षणाधिकारी यांना दिसून येईल.


            या स्क्रीन मध्ये गटशिक्षणाधिकारी हे अशा शाळांची माहितींची शहानिशा करून खरोखर या शाळेला ही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे का हे ठरवतील.त्यानंतर from date व to date मध्ये ही सुविधा किती सदर शाळेला किती दिवस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे निश्चित करतील.ही सुविधा किती दिवस द्यावी हे निश्चित करताना किती विद्यार्थी नोंद करावयाचे आहे यावरून सदर शाळेला द्यावयाचा कालावधी ठरवतील. दिलेल्या कालावधी मध्ये सदर शाळेला आपले विद्यार्थी नोंद करणे गरजेचे आहे,त्यानंतर सदर शाळेला पुन्हा संधी देण्यात येऊ नये अशा सुचना वरिष्ठ लेवल कडून देण्यात आलेल्या आहे याची गटशिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी.गटशिक्षणाधिकारी ही सुविधा एका वेळेला मात्र १० शाळांना देऊ शकतील.त्यानंतर school कोड मध्ये शाळेचा udise कोड भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.




        शाळेचा udise नंबर भरल्यानंतर त्या समोर असलेल्या school name या option मध्ये आपोआप त्या शाळेचे नाव येईल.त्यानंतर शेवटी दिलेले add बटनावर क्लिक करावे.त्यानंतर school added successfuly असा message स्क्रीन वर आलेला दिसून येईल.


           add बटनावर क्लिक केल्यावर जी शाळा beo यांनी select केलेली आहे ती शाळा curently active school च्या लिस्ट मध्ये add झालेली दिसून येईल.खालील स्क्रीन मध्ये सदर शाळा ही दिनांक ०९-०९-२०१६ ते १७-०९-२०१६ या तारखेदरम्यान नविन विद्यार्थ्यांची माहिती भरू शकेल हे दिसून येत आहे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.


   
       गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त सुविधा सदर शाळेला उपलब्ध करून दिल्यानंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक हे आपले login करतील.



        उपरोक्त सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या udise आणि paasword ने login व्हावे.मुख्याध्यापकांनी login करताना पुढील स्क्रीन त्यांना दिसून येईल याची नोंद घ्यावी.


           वरील स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे मुख्याध्यापक हे student entry या मुख्य बटनाला क्लिक करून  new students details या बटनाला क्लिक करतील.त्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे Personal Detail For Academic Year 2016-17  हा नविन विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेला दिसून येईल.या वेळी सदर फॉर्म मधून आपण आपल्या शाळेला लागू असलेल्या इयत्ता १ ली वगळता इतर कोणत्याही वर्गातील विद्यार्थी माहिती ही online पद्धतीने भरू शकाल.



        अशा पद्धतीने मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन मधून ही सुविधा उपलब्ध केल्यावर त्यांच्या लॉगीन मधून माहिती भरू शकेल.